Co-Curricular 
Graduation day of Sr kg (English Medium School (KG)Bhilwadi)

English medium school Bhilwadi  April 29,2023

   *फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याचं बळ मुलांच्यात निर्माण करून भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या बरोबर पालकांची जबाबदारी -श्री. एम.आर. पाटील सर* भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी मध्ये *शनिवार दि. २९/०४/२०२३* रोजी सिनियर के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस कार्ड डिस्ट्रिब्युशन (निकाल पत्रक वितरण )समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात *प्रमुख पाहुणे श्री. महेश पाटील सर -* सहाय्यक प्राध्यापक , बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी यांनी वरील उदगार काढले.यावेळी *अध्यक्षपदी मा.के. डी पाटील सर-* सहसचिव भिलवडी शिक्षण संस्था व विभाग प्रमुख इंग्लिश मिडियम, प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी , कु. विद्या टोणपे- मुख्याध्यापिका इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी ई. उपस्थित होते सिनिअर के.जी. मधील सर्व विद्यार्थ्यांना निकाल पत्रक , ९०% वरील विद्यार्थ्यांना जनरल प्रोफिशियंसी सर्टिफिकेट पाहुण्यांचे हस्ते देण्यात आले. यावर्षी शिक्षणाबरोबरच, विविध उपक्रमांमध्ये सहभागी व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळालेल्या विद्यार्थ्यांला प्रथमच *स्टुडंट ऑफ द इअर* अवार्ड देण्यात आले. सन २०२२-२३ ची स्टुडंट ऑफ द इअर अवार्ड *कु ईशा भाग्येश चौगुले* या विद्यार्थिनीला मिळाला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून देत पालकांच्या सहकार्याबद्दल अभिनंदन केले. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत मुलांच्या जडणघडणात या गोष्टी कशा उपयोगी आहेत व गरजेचे आहेत हे सांगितले तसेच शक्यतो मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे,अशी त्यांनी पालकांना विनंती केली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. के. डी. पाटील सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या कार्यक्रमातील पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता त्यांनी पालकांना के.जी. मधील अनौपचारिक शिक्षणाबरोबरच इयत्ता १ ते १० पर्यंत आपल्या पाल्याच्या औपचारिक शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने मॅडम, सूत्रसंचालन सौ. अश्विनी सूर्यवंशी टिचर व स्वागत व आभार मंजूश्री सपकाळ टिचर यांनी केले. कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.