Co-Curricular 
science day celebration (English Medium School (KG)Bhilwadi)

English medium school Bhilwadi  April 28,2023

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, भिलवडी मध्ये मंगळवार दि. २८/०२/२०२३ रोजी नोबेल पारितोषिक विजेते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी . व्ही. रमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या सुरवातीला पालक श्री. सुहास पाटील सर यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करत प्रदर्शन सर्वांसाठी खुले केले. सिनियर के. जी. मधील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मोठ्या उत्साहात व आनंदात सहभाग घेतला. विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले. 1)What Dissolved in water 2)Magnet Maze Game Experiment 3)Static Electricity 4) Sink and Float 5) Refraction of Light 6)The Egg Game Experiment 7)Seperating Salt and Pepper 8)Mixture of Oil and Water 9) Lemon and Potassium permanganate 10) Magnet Game, अशा अनेक प्रयोगांचे प्रात्यक्षिक मुलांनी स्वतः करून त्याची माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे पालकांनी कौतुक करत शाळेने सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सौ. लीना वहिनी चितळे या आवर्जून उपस्थित राहिल्या तसेच सर्व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने टिचर , सर्व शिक्षक वृंद व सेवक उपस्थित होते.